फडणवीसांनी ग्रृह विभागाची शासकीय १०० एकर जमीन अवैधरीत्या दिल्याप्रकरणी ग्रृहविभागास चौकशीचे विधानसभा अध्यक्ष पटोले यांचे आदेश

 

सुनील उत्तमराव साळवे
(९६३७६६१३७८)
कार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत नागपुर

नागपुर : १५ जुलै २०२०
महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी मीडिया ला बोलताना सांगितले की, नागपुरातील ख्यातनाम वकील तसेच माहिती अधिकार कार्यकर्ते अँड. सतिश ऊके यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील झिंगाबाई टाकळी येथील १०० एकर ग्रृह खात्याची शासकीय जमिन रामदेवबाबा सार्वजनिक समितीला अवैधरीत्या वाटल्याची तक्रार सर्व विभागाला दिली. त्याची एक तक्रार विधानसभा अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांना सुद्धा दिली.
या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर नानाभाऊ पटोले यांनी या प्रकरणाची गंभीरपणे दखल घेत ग्रृहविभागास या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले असुन यातुन सत्य बाहेर काढावे असे नानाभाऊ पटोले यांनी मीडिया समोर व्यक्त केले.
जज लोया प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याचे जज लोया यांची जहर देऊन हत्या केल्याचा आरोप व याचिका हायकोर्टात दाखल करुन सनसनाटी निर्माण करणारे अँड. सतिश ऊके हे तेच वकील आहेत ज्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या निवडणुक पुर्व शपथपत्रात काही गुन्हे लपविल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करुन संबधित प्रकरण कोर्टात दाखल केले असुन त्यासंबंधी कोर्टात सुनावणी सुरू आहे. फडणवीस यांचेविरुद्धात तक्रार केल्यानंतर अँड. सतिश ऊके हे चर्चेत आले होते हे विशेष!
चर्चा आहे की देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या जवळचे भाजप नेते तथा खासदार बनवारीलाल पुरोहित यांच्या रामदेवबाबा सार्वजनिक समिती तसेच भवन्स शिक्षण संस्थेला सुद्धा अशाच पद्धतीने जमिन दिल्याची तक्रार अँड. सतिश ऊके यांनी केल्याचे समजते. त्यामुळे सध्या तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चांगलेच अडचणीत आले आहे. एरव्ही कांग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस च्या नेत्यांविरुद्ध भ्रष्टाचार करण्याचे सातत्याने आरोप करणारे देवेंद्र फडणवीस हे विधानसभा अध्यक्ष पटोले यांनी चौकशी चे आदेश दिल्यानंतर सध्या या प्रकरणी शांत असल्याचे व मीडिया पुढे येण्यासाठी तयार नाहीत असेही बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here