सेलू : नगरपंचायतची ऑनलाइन सभा मंगळवार (ता. ८) ऑनलाइन पद्धतीने संपन्न झाली. कोरोना संसर्गाच्या वाढत्या व्याप्तीमुळे सर्वत्र हाहाकार पसरला आहे. परिणामी शासनाच्या दिशनिर्देशानुसार स्थानिक नगरपंचायत प्रशासनाने सर्व नगरपंचायतचे नगरसेवक, नगरसेविका सहित मुख्याधिकारी कांचन गायकवाड, प्र.अधिकारी रघुनाथ मोहिते, नगराध्यक्षा शारदा माहुरे, उपनगराध्यक्ष अनिल काटोल यांनी ऑनलाइन गुगल मिट ऍप च्या माध्यमातून सभा आयोजित केली होती. त्यामध्ये नियोजनानुसार ठराव मंजूर तर काही विषयाला बहुमताने स्थगिती देण्यात आली.
या सभेमध्ये सहभागी होत असताना प्रथमच ऑनलाइन पद्धतीने सभा असल्याने काही विषय मांडताना अडचणी येत होत्या तर नेटवर्क बरोबर नसल्यामुळे काही गोष्टी मांडता आल्या नाही अशी खंत सेलू नगर सुधार आघाडीचे अध्यक्ष तथा नगरसेवक शैलेंद्र दप्तरी, राजेश मिश्रा, चुडामन हांडे, अनिल देवतारे, हिम्मतअली शहा, सनी खोडे, नगरसेविका वैशाली पाटील व अन्य नगरसेवक, नगरसेविका यांनी व्यक्त केली.