एलसीबीसह आठ ठाण्यांचे निरीक्षक बदलले! प्रशासकीय कारणास्तव केले खांदेपालट; पोलिस अधिक्षकांचा निर्णय

वर्धा : पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी त्यांच्या अधिकाराचा वापर करून जिल्ह्यातील तब्बल बारा पोलीस अधिकाऱ्यांचा बदल्या केल्या आहेत.

पुलगाव येथील पोलीस निरीक्षक रविंद्र गायकवाड यांना पोलीस स्टेशन सेलू, समुद्रपूर पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक हेमंत चांदेवार यांची पोलीस स्टेशन रामनगर, पोलीस नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक चंद्रशेखर चकाटे यांची पोलीस स्टेशन सिंदी (रेल्वे), स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नीलेश ब्राह्मणे यांची पोलीस स्टेशन सेवाग्राम येथे ठाणेदार म्हणून बदली करण्यात आली आहे.

तर आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भानुदास पिदुरकर यांची पोलीस स्टेशन आर्वी, वाहतूक नियंत्रण शाखेचे राजेश कडू यांची पो.नि. मानव संसाधन, आर्वी येथील पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांची स्थानिक गुन्हे शाखा, अल्लीपूर येथील पोलीस निरीक्षक शैलेश शेळके यांची पोलीस स्टेशन पुलगाव, सेलूचे पोलीस निरीक्षक सुनील गाढे यांची पोलीस स्टेशन अल्लीपूर, रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनाजी जळक यांची वाहतूक नियंत्रण शाखा वर्धा, सेवाग्राम पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांची आर्थिक गुन्हे शाखा तर सिंदी रेल्वे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांची समुद्रपूर पोलीस स्टेशन येथे बदली करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here