

आष्टी (शहीद) : समोरासमोर झालेल्या धडकेत कारमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवार १२ नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास आष्टी पंचायत समिती पुलाजवळ घडली.
साहुरवरून येणारी कार क्रमांक एमएच ३२ एएन ८३०४ चा चालक हेमंत वरकड रा. साहूर व तळेगाव वरुन येणारी कार क्रमांक एमएच ३० एए ३८५१ या दोन्ही कारने एकामेकाला समोरासमोर धडक दिली. रस्त्यालगत अत्यंत अरुंद कटघरे लावल्यामुळे येणारे वाहन वळणामुळे दिसत नाही. अशातच सदर कारने एकमेकांना जबर धडक दिली. त्यात दोन्ही गाडीचे नुकसान झाले असून गाडीमधील प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना आष्टी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून अधिक तपास आष्टी पोलिस करीत आहेत.