

वर्धा : आद्य ग्रामगीताचार्य रामकृष्णदादा बेलूरकर विचार प्रतिष्ठान नागपूर यांच्या माध्यमातून गावात आदर्श ग्राम निर्माण संमेलन संपन्न झाले. या संमेलनामध्ये गावातील स्मशानभूमी स्वच्छ करण्यात आली. सुंदर रांगोळ्यांनी स्मशानभूमी सजली चैतन्याचे वातावरण निर्माण झाले. हेच सातत्य पुढे राहण्यासाठी आद्य ग्रामगीताचार्य रामकृष्णदादा बेलुरकर विचार प्रतिष्ठान नागपूर तर्फे चला गावासाठी गाडगेबाबा बनवूया या माध्यमातून दर रविवारी ग्रामस्वच्छता अभियान होत आहे. तुकारामदास घोडे महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत अभियान संपन्न झाले.
वंदनीय राष्ट्रसंतांचे रचनात्मक कार्य पूज्य दादांच्या अमृतवाणीतून जन्मभर केले. भजन पूजनाच्या व्यतिरिक गाडगेबाबा, राष्ट्रसंतांचा रचनात्मक संदेश रामकृष्ण दादा नी पोहचविला संपूर्ण अभियान वर्षभर विविध उपक्रम राबवत आहेत. गावातील कृष्णाजी डबुरकर, वामनराव मते, डॉक्टर मनोज जयस्वाल, आनंद तुरंणकर, मोरेश्वर मानकर, दिलीप ठाकरे, गजानन वरघणे, मनोहर शिंदे, शेषराव कारामोरे, वासुदेव हटवार, नामदेव ङोगरे, ऑक्सफर्ड स्कूलचे प्राचार्य सुधीर जिदे सर, प्रफुल मोते सेवाग्राम दवाखान्याचे सुनील लोहे, प्रतिष्ठानचे सभासद सुरेंद्र बेंलुरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत गावासाठी गाडगेबाबा बनवूया हे अभियान संपन्न झाले. संपूर्ण वर्षभर गाव विकासासाठी प्रत्येक महिन्यात विविध स्पर्धा संपन्न होत आहेत आदर्श स्मशानभूमी तयार करण्यासाठी गावातील सर्व समाज बांधवांनी पवित्र कार्यास सहभागी व्हावे. व गावाच्या विकासात सहभागी व्हावे असे आव्हान श्री तुकाराम दास घोडे महाराज यानी केले. राष्ट्रवंदनेने स्वच्छता अभियानाची सांगता झाली.