

पवनार : केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी उत्पादनवाढीचे अचूक तंत्रज्ञान आणि आधुनिक पद्धतींचे मार्गदर्शन देण्यासाठी “केळी पीक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. यांच्या पुढाकाराने (ता. २९) रोजी सकाळी १० वाजता कुंदन वाघमारे यांच्या शेतावर (पवनार ते सुरसा रोड, नागठेवडी जवळ) हा परिसंवाद होणार आहे.
परिसंवादात पूर्व मशागत, टिश्यू कल्चर रोपांची लागवड, पाणी व्यवस्थापन, अन्नद्रव्य व्यवस्थापन, फर्टिगेशन ऑटोमेशन, किड व रोग व्यवस्थापन (विशेषतः सिगाटोका व CMV), तसेच फळ काढणी व निर्यात यावर सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे. परिसरातील सर्व केळी उत्पादकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या परिसंवादाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून आंतरराष्ट्रीय केळी तज्ज्ञ डॉ. के. बी. पाटील व ज्येष्ठ शेतीतज्ज्ञ डॉ. दादाजी हिवरे उपस्थित राहणार आहेत. प्रमुख प्रोत्साहक म्हणून द डिव्हाईन बनाना फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष श्री. कुंदन वाघमारे आणि सचिव श्री. चंद्रश्याम मातुरे यांची उपस्थिती लाभणार आहे. जिल्हा कृषी अधिकारी श्री. शंकर तोटकवार व प्रयोगशील शेतकरी श्री. सचिन पावडे यांचा ही प्रमुख उपस्थिति लाभणार आहे.