कोरोना लसीकरनाकरिता नागरिकांना मोफत वाहन सेवा! महाकाळ ग्रामपंचायतीचा उपक्रम

सायली आदमने

वर्धा : शहरालगत असलेल्या महाकाळ ग्रामपंचायतचा शासनाच्या सर्वच योजनांमध्ये पुढाकार असतो कोरोना महामारीच्या काळात नागरीकांचा या महामारीपासुन बचाव व्हावा याकरीता सरपंच सुरज गोहो यांनी पुढाकार घेत गावात लसीकरनाची व्यवस्था नसतानाही लसीकरनाबाबत जनजागृती करीत गावापासुन १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या आंजी (मोठी) येथील लसीकरन केंद्रावर नेण्याकरीता वाहनाची मोफत व्यवस्था येथील नागरीकांना करुन दिली आहे.

कोरोना महामारीवर लसीकरन हाच एकमेव पर्याय असल्याने कोरोना लसीकरन करण्यावर ग्रामपंचायतीचा भर देत मोठ्याप्रमाणावर जणजागृती करीत आहे. ग्रामस्थांना यासाठी प्रोत्साहीत करुन लसीकरनाकरीता मोफत वाहनांची सुविधा उपलब्ध करून दिली नागरीकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असुन आतापर्यंत २२५ ग्रामस्थांनी या माध्यमातून लसिकरन करुन घेतलेले आहे.

या मोफत वाहतुकीकरीता वाहनांची सोय उपलब्ध करून दिल्याने येथील गरीब गरजू नागरीक ज्यांना लसीकरनाकरीता जान्याची सोय नव्हती त्यांना या मोफत वाहतुक सेवेतुन मोठा लाभ मिळाला. ही सेवा ग्रामपंचायत आपल्या विशेष निधीतून करीत असुन यात कुठलीही कमतरता पडणार नाही असे येथील गोह यांनी सांगीतले. या कार्यात येथील ग्रामपंचायतचे उपसरपंच मंगेश राऊत, सचिव एच. ऐ. सावरकर, ग्रामपंचातीचे सर्व सदस्य, गावातील आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविका यांचे मोलाचे सहकार्य करीत आहे.

प्रतिक्रीया…

आम्ही ग्रामस्थांना लसीकरन केंद्रावर पोहचविण्याकरीता मोफत सेवा देत असलो तरी इतक्या लांब लसीकरनाकरीता जाने ग्रामस्थांकरीता खुप त्रासदायक होते. शासनाने गावागावात आरोग्य विभागाच्या वतीने शिबीराच्या माध्यमातुन लसीकरन मोहिम राबवील्यास ग्रामस्थांची लसीकरनाकरीता होनारी फरपट थांबेल.
सरपंच सुरज गोहो, महाकाळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here