धान घेऊन जाणारा ट्रक सत्याग्रही घाटात उलटला! वाहक, चालक अन्‌ सहप्रवासी जखमी

तळेगाव (श्या.पंत) : छत्तीसगढ मोहगाव येथून जळगाव जामनेर येथे धान घेऊन जाणारा भरधाव ट्रक अनियंत्रित होऊन उलटला. हा अपघात नागपूर अमरावती मार्गावरील सत्याग्रही घाटात बुधवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास झाला असून यात वाहनातील तिघे व्यक्‍ती जखमी झाले. या अपघाताची नोंद तळेगाव पोलिसांनी घेतली आहे.

एम.एच.४१ ए. जी. ६६७२ क्रमांकाचा ट्रक जळगावच्या दिशेने जात असताना अज्ञात ट्रकचालकाने त्याच्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणे चालवून धान भरलेल्या ट्रकला कट मारला. अशातच धानाची पोती घेऊन जाणाऱ्या ट्रकचालकाचे वाहतूक करणारा द्रक. वाहनावरील नियंत्रण सुटले. वाहनावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू असताना ट्रक रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला. या अपघातात ट्रकचालक, वाहक तसेच ट्रकमधील एक व्यक्‍ती किरकोळ जखमी झाली.

अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन जखमींना रुग्णालयाकडे रवाना केले. शिवाव अपघाताची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच तळेगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या अपघाताची नोंद तळेगाव पोलिसांनी घेतली असून पुढील तपास ठाणेदार आशिष गजभिये यांच्या मार्गदर्शनात पोलीस जमादार दिगांबर रुईकर, आकाश शिंदे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here