…..म्हणे मार्च एण्डींग आहे! वीज बिल भरता की लाईन कापू


सतीश खेलकर

वर्धा : भाऊ मार्च एण्डींग आहे वरीष्ठ अधिकार्यांकडून वसुलीच प्रेशर आहे. वीज बिल भरता की लाईन कापू असा थेट कॉल विजग्राहकांना वितरण विभागाच्या कर्मचार्यांकडून येत असल्याने सर्वसामान्य जनतेमध्ये आता याची धडकी भरल्याचे दिसुन येत आहे. विज पुरवठा बंद होतो की काय अशी भिती विजग्राहकांना वाटत आहे. दोन वेळच्या जेवणाची गरज कशीबशी भागविनार्या सामान्य नागरीकांना आता काय करावे हा प्रश्न पडला आहे.

गेल्या वर्षभरापासुन देशभर थैमान घातलेल्या कोरोना महामारीमुळे किमान ७ ते ८ महिने लॉकडाऊन असल्यामुळे नागरिकांच्या हाताला काम नव्हते, त्यामुळे सर्वसामान्य जनतेवर उपासमारीची वेळ आली होती. परिणामी अनेकांकडे विजबील थकीत होते. परिस्थिती थोडी सावरत असताना महावितरण कंपनीने लॉकडाऊन काळातील थकीत वाढीव वीजबील भरण्यासाठीची सक्तीची वसुली मोहिम राबवली आहे. ग्राहकांना कॉल करुन २ दिवसात वीज बिल सरसकट न भरल्यास विद्युत पुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला आहे. एवढेच नव्हे तर काही ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित सुद्धा केला जात आहे.

वर्षभरानंतर काही काळ सुरळीत चालू झालेला रोजगार कोरोना माहामारीच्या दुसर्या लाटेत पुन्हा विस्कटण्याच्या मार्गावर आहे. राज्यात पुन्हा लॉकडाउन होण्याच्या मार्गावर असताना मात्र वितरण विभाग विज बील भरण्याकरीता ग्राहकांना वेठीस धरीत आहे. वीज बिल थकीत असलेल्या वीज ग्राहकांना वीज वितरण कंपनीचे कर्मचारी उर्मट व अरेरावीच्या भाषेत उत्तर देऊन नाहक त्रास देत असल्याच्या तक्रारी आहे.

कोरोना संक्रमणाच्या काळात सर्व व्यवसाय ठप्प होते त्यामुळे कोणत्याही प्रकारचा विजेचा वापर या काळात व्यावसाईकांकडून झाला नाही मात्र तरीही वीज वितरण विभागाने सर्व महिन्याचे अव्वाच्या सव्वा व्याज आकारत नागरीकांना विजबील पाठवत लूटले आणि आता वीज बील भरण्याकरीता तकादा लावला आहे. खरतर लॉकडाऊनच्या काळात वीज ग्राहकांना वीज दरात सूट मिळायला हवी होती, मात्र तसे तर झाले नाहीच याउलट जवळपास १८ ते २० टक्क्यांनी वीज बीलात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे विरतण विभागाच्या विरोधात जनसामान्यांमध्ये तिव्र रोष निर्माण झाला आहे.

प्रतिक्रीया……

किरायाचा ब्लॉकमध्ये पाणटपरीचा व्यवसाय चालऊन घर चालवितो मात्र लॉकडाउनच्या काळात सलग ६ महिने व्यवसाय बंद होता एकही रुपयाची विज वापर झाला नाही मात्र तरिही मोठ्या प्रमाणात विजबील आले आहे. परिस्थीती अतिशय गंभीर आहे थकलेल विजबील भराव की दोनवेळच्या जेनणाच पहाव हाच विचार सतत चालू आहे.

अमोल उमाटे, पाणटपरीचालक पवनार

कोरोना महामारीत झालेल्या लॉकडाऊनमुळे ऑटोचालकांची परिस्थीती काय आहे हे सर्वांनाच माहित आहे. तरीही विजबील थकल्याने मागील महिन्यात विज कनेक्षन कापल्या गेल व्याजाने पैसे काढून अर्ध विजबील भरल आता मार्च एण्डींग आहे वाटते आता आनखी लाईन बंद करते की काय याची धास्ती वाटत आहे. सरकारन विजबील माफ करुन सामान्य जनतेला या जाचातून मुक्त कराव.

नरेश कोराम, ऑटोचालक पवनार

 

 


वितरण विभागाच्या कर्मचार्यां फजिती….

वीज वितरण विभागाच्या कर्मचार्यावर टांगती तलवार लटकत असल्याचे दिसून येत आहे. ऐकीकडे वसूलीकरीता वरिष्ठ अधिकार्यांचा दबाव तर दुसरीकडे नागरीकांकडून मिळतो शिव्या, श्याप त्यामुळे अशा परिस्थितीत काय करावे असा प्रश्न त्यांच्यासामोर निर्माण होत आहे. परिणामी ईकडे खाई तिकडे विहर अशा संकटात वीज वितरण करमचारी अडकल्याचे दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here