![](https://www.rashtrahitnews.in/wp-content/uploads/2023/11/WhatsApp-Image-2023-11-10-at-8.26.25-PM-1.jpeg)
गिरड : व्हिडीओ शुटींग का केली, या कारणातून वाद करीत व्यक्तीस दगडाने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पिंपळगाव येथे ही घटना घडली. अशोक चितोडे हा शेतात असताना आकाश नरांजे, राजकुमार नरांजे, रविंद्र नरांजे यांनी त्यास अडवून तु आमचे व्हिडीओ शुटींग केली का, असे म्हणत शिवीगाळ करून दगडाने डोक्यावर तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत जखमी केले. याप्रकरणी गिरड पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास गिरड पोलीस करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.