अपघातात दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू

नागपूर : अपघातात जखमी झालेल्या महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. वर्षा महादेव शहाणे (वय ४०) असे त्यांचे नाव आहे. कामठी जवळच्या टेमसना गावात राहणाऱ्या वर्षा त्यांचे नातेवाईक गणेश सीताराम शहाणे (वय ६०) यांच्यासोबत २० ऑक्टोबरला सकाळी ८ च्या सुमारास दुचाकीने नागपुरात आल्या होत्या, वाठोडा ते पांढुर्णा मार्गावर दुचाकीसमोर अचानक कुत्रा आल्याने त्यांनी दुचाकीचे करकचून ब्रेक मारला.

त्यामुळे खाली पडून वर्षा गंभीर जखमी झाल्या. त्यांना पारडीच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता, शनिवारी दुपारी १.३० च्या सुमारास डॉक्टरांनी वर्षा यांना मृत घोषित केले. मिळालेल्या माहितीवरून वाठोडा पोलिसांनी अपघाताची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here