५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज! दुकानाला लागली आग; इंदिरा मार्केट परिसरातील घटना

देऊरवाडा/आर्वी : दुकानाला अचानक लागलेल्या आगीत दुकानातील मसाले व इतर साहित्य जळून खाक झाले. ही घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास इंदिरा मार्केट परिसरातील मच्छीबाजार येथे घडली असून, शनिवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी व्यावसायिकाने पोलिसांत तक्रार दिली असून, सुमारे ५० हजार रुपयांच्या नुकसानीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

शेख समीर शेख कादीर रा. जनतानगर हे मसाल्यांचा व्यवसाय करतात. तालुक्यातील अनेक गावांत ते बाजाराला जातात. परत आल्यावर रात्री उर्वरित साहित्य मसला दुकानात ठेवतात. शुक्रवारी रात्रीला अचानक दुकानाला आग लागली. आगीत सर्व मसाले तसेच इतर साहित्य जळून खाक झाले. पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. मात्र, आग नेमकी कशाने लागली हे समजले नाही. या गरीब व्यावसायिकाला आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिलीप पोटफोडे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here