म्हसाळ्यात घरफोडी! २.२३ लाखांचे दागिने लपास

वर्धा : कुलूपबंद घराला लक्ष्य करीत दाराचे कुलूप तोडून चोरट्याने घरात प्रवेश करीत रोख रकमेसह दोन लाख २३ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. ही घटना पार्वतीनगर, म्हसाळा येथे उघडकीस आली.

अनिल गावंडे हा कुटुंबासह धानोरा येथे वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त पत्नीसह गेला होता. रात्रीच्या सुमारास चोरट्याने घराच्या दाराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करीत कपाटातून सोन्याची चेन, सोन्याच्या तीन अंगठ्या, सोन्याचे झुमके, सोन्याच्या बिऱ्या, कानातील रिंग, मंगळसूत्र, सोन्याची नथ, चांदीचे आकडे, पायपट्टया, जोडवे तसेच २० हजार रुपये रोख रक्‍कम असा एकूण दोन लाख २३ हजार ९०० रुपयांचा ऐवज चोरून नेला.

अनिल श्याम गावंडे हा दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आला असता त्याला घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ याची सेवाग्राम पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरून आरोपी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती सेवाग्राम पोलिसांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here