
वर्धा : चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तीच्या डोक्यावर अज्ञातांनी रॉडने मारहाण करीत हत्या केली. ही घटना शनिवारी सकाळच्या सुमारास सेवाग्राम नजीकच्या खाद्य निगम गोदामालगत असलेल्या रेल्वे रूळालगतच्या परिसरात उघडीस आली. सम्राट ज्ञानेक्ष्वर वाघमारे (3५) रा. म्हसाळा जुनी वस्ती असे मृतकाचे नाव आहे.
सकाळच्या सुमारास रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडून असल्याचे परिसरातील नागरिकांना लक्षात आले. एका सुजान नागरिकाने याबाबतची माहिती पोलिसांना दिली. दरम्यान सेवाग्राम पोलीस ठाण्याचे ठाणेदार कांचन पांडे यांनी कर्मचाऱ्यांना सोबत घेत घटनास्थळ गाठले असता सम्राट वाघमारे याच्या डोक्यावर रॉडने मारहाण करीत हत्या केल्याचे दिसून आले.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी पियूष जगताप यांनी घटनास्थळी भेट देत परिसराची पाहणी केली. पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र ठाकूर, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र इंगळे, सौरभ घरडे, सुमीत कांबळे, सुधीर लडके, श्वानपथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रश्नांत नेरकर, सिद्धार्थ सोमकुवर यांनी घटनास्थळ गाठून आरोपींचा शोध घेतला.
आरोपी पोलिसांच्या रडारवर
घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी पियूष जगताप, ठाणेदार कांचन पांडे दाखल झाले होते. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली, यावेळी डोक्यावर रॉडने वार केल्याचा अंदाज आ्लिसांनी व्यक्त केला. शिवाय या घटनेतील आरोपी पोलिसांच्या रडारवर असून लवकरच अटक करण्यात येईल. असेही ठाणेदार कांचन पांडे यांनी सांगितले.
मृतावर चोरीचे गुन्हे दाखल
मृतक सप्राट वाघमारे याच्यावर चोरी, दारुविक्री, किरकोळ हाणामारीचेही गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. तीन दिवसांपूर्वीच त्याच्यावर कलप १२२ अंतर्गत गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे ही हत्या चोरीच्या आदातून तर झाली नसेल ना, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
शवविंच्छेदनाला लागले दोन तास
मृत संग्राट वाघमारे याची उत्तरिय तपासणी सेवाग्राम येथील रुग्णालयात डॉ. प्रविण झोपाटे यांनी केली. सुमारे दोन तास चाललेल्या शवविच्छेदनादरम्यान मृताच्या डोक्यावर गंभीर जखमा तसेच त्याच्या मेँदूत जास्त प्रमाणात रक्त गोठल्याचे डॉक्टरांच्या प्राथमिक तपासणीत पुढे आले आहे.

















































