

https://youtu.be/m7ixZ2gXHTYपवनार : येथील महात्मा गांधी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी 12 फेब्रुवारी रोजी यात्रेचे आयोजन करण्यात येते, मात्र यावर्षी प्रशानाने कोणत्याही प्रकारची पूर्व सूचना न देता यात्रा रद्द करण्यात आल्याने व्यवसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अचानकपणे यात्रा रद्द करण्यात आल्याने पवनार वासीयांमध्ये नाराजी दिसून येत आहे.
पवनार हे गाव आचार्य विनोबा भावे यांची कर्मभुमी येथे दरवर्षी हजारोच्या संखेने १२ फेब्रुवारीला यात्रेकरु येतात. या दिवशी पवनार गावात आनंदाचे वातावरण असते या यात्रेत नागपूर, वर्धा, सेलू, केळझर, देवळी अशा अनेक गावातून छोटे- मोठे व्यवसायिक आपला व्यवसाय थाटतात दुरवरुन आनेक नागरीक येत या यात्रेत सहभागी होतात, मात्र यावर्षी अचानकपणे यात्रा रद्द झाल्याने बाहेर गावातून आलेल्या व्यवसायिकांना आल्या पावली परत जावे लागले, यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यात्रा रद्द असल्याचे कोणत्याही पूर्व सूचना प्रशासने दिल्या नसल्याने पवनार वासियांमध्ये नाराजी दिसून येत आहे.