
वर्धा : समुुद्रपुर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग नागपुर चंद्रपुर हायवेवर बरबडी शिवारात गुरुवारी संध्याकाळी नागपुरवरुन वणीला सेंट्रिग घेऊन जात असताना बुलेरो पिकअप गाडीचे मागील दोन टायर फुटल्याने गाडी पलटी होऊन एकाचा जागीच मृत्यू झाला तर पाच गंभीर जखमी झाले आहेत. मृत व्यक्तीचे नाव फुलकुमार झाडू उईके रा सिल्लारी जी शिवणी ( म. प्रदेश) असे आहे.
कामाला जात असताना त्यांच्या गाडीचे मागचे दोन्ही टायर फुटल्याने बरबडी शिवारातील अपघात झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर पाचजण गंभीर जखमी झाले आहेत.





















































