
आर्वी : शहरात अवैधरित्या वाळूची वाहतूक करताना ट्रक पकडला असून तो तहसील कार्यालयात जमा करण्यात आला आहे. ही कारवाई महसूल विभागाने केली आहे. जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार शनिवारी आर्वीतील तहसील कार्यालयाच्या इमारतीची पाहणी करण्याकरिता आल्या होत्या. यावेळी परिसरात होणाऱ्या अवैध वाळू चोरीविषयी पत्रकारांना माहिती देण्यात आली.
चर्चेदरम्यान वादही निर्माण झाला, त्यानंतर रात्रीच्या सुमारास शिवाजी चौक ते गांधी चौक या मार्गावर एम.एच. 3२ ए.जे. ५०२५ क्रमांकाचा ट्रक वाळू खाली करताना दिसून आला. या वाहनचालकाकडे वाळू वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याने तहसीलदार विद्यासागर चव्हाण यांच्याशी संपर्क साधून माहिती देण्यात आली. नायब तहसीलदार विनायक मगर व अमोल कदम यांनी घटनास्थळी जाऊन ट्रक जप्त केला.