अपघातात चालकाचा केबिनमध्ये दबून मृत्यु! चालकादिरुद्ध गुन्हा दाखल

वर्धा : भरधाव कंटेनरने अचानक ब्रेकमारल्याने मागून येणारा कंटेनर समोरील कंटेनरवर धडकल्याने चालकाचा केबिनमध्ये दबून मृत्यू झाला. हा अपघात १४ रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास अमरावती ते नागपूर महामार्गावर असलेल्या राजणी फाट्याजवळ झाला.

सूरज जवाहर जैस्वाल, रा. नागपूर आणि नितेश विश्‍वकर्मा, रा. नागपूर हे दोघे एम.एच. ४० सी. डी. ७९७६ क्रमांकाचा कंटेनर घेऊन अमरावती ते नागपूर रस्त्याने जात असताना राजणी फाट्याजवळ त्यांच्या समोर असलेल्या अज्ञात कंटेनरने ब्रेक मारले. यामुळे नितेश विश्‍वकर्मा चालवीत असलेला कंटेनर अनियंत्रित होऊन समोरील कंटेनरवर धडकला. यात सूरज जैस्वाल हा ट्रकबाहेर फेकला गेला. तर चालक नितेश विश्‍वकर्मा याचा कंटेनरच्या केबिनमध्ये दबल्याने मृत्यू झाला. याप्रकरणी कारंजा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी अज्ञात कंटेनर चालकादिरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here