शिवीगाळ करीत रॉडने मारहाण! हाणामारीप्रकरणात सात जणांविरुद्ध गुन्हे दाखल

वर्धा : परप्रांतीय आणि कामगारांमध्ये वादातून झालेल्या हाणामारीत सावंगी पोलीस ठाण्यात परस्परांविरुद्ध दिलेल्या तक्रारीवरुन सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. आकाश कुमार दिनेश चौधरी याने दिलेल्या तक्रारीनुसार, तो मित्रासह जेवण करुन बसला असताना तो पाणी आणण्यासाठी खोलीवर गेला असता आरोपी सुरक्षारक्षक प्रदीप व त्याचे दोन सहकारी तेथे आले आणि शिवीगाळ करीत मारहाण केली. आकाराचे मित्र वाद सोडविण्यासाठी धावले असता त्यांनाही रॉ डने मारहाण करीत जखमी केले.

याप्रकरणात प्रदीप आणि त्याच्या दोन मित्रांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. तसेच लखनसिंग अमरसिंग रजावत याच्या तक्रारीनुसार आरोपी वैजनाथ कुमार महेंद्र चौधरी, नवीन श्याम शर्मा, आकाश कुमार दिनेश चौधरी, धानकुमार लालन साहा यांनी लखनसिंगला तु आमच्या मित्रास का मारले, असे म्हणून सुरक्षा कार्यालयाची तोडफोड करुन ५ हजाराचे नुकसान केले. दगडाने डोक्यावर मारहाण करीत जखमी केले. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी दोन्ही तक्रारीनुसार सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. अधिक तपास पोलिस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here