जीव धोक्यात घालून माकडाला जीवनदान; कौस्तूभ गावंडे यांची कामगिरी! दोन तासाच्या प्रयत्नानंतर यश

वर्धा : हिंगणा वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या पेंढरी जंगला लागतच्या गावात कळपापासून भरकटलेल्या एका नर जातीच्या माकडाने धुमाकूळ घातला होता हा माकड गावकऱ्यांवर, शाळेतील विद्यार्थ्यांवर हल्ले चढवीत होता याचा बंदोबस्त करण्याकरीता वनविभागाने बरेच प्रयत्न केले मात्र या माकडाला जेरबंद करण्यात यश आले नसल्याने वर्धा येथील पिपल्स फॉर अँनिमल्सची टीम घटनास्थळी पोहचत हुलकावणी देऊन ९० फूटावर जाऊन बसलेल्या माकडाला कौस्तूभ गावंडे यांनी टावरवर चढत जीव धोक्यात घालून जेरबंद केले.

शेतीचे कामे सुरू झाल्याने शेतातील बियाण्यांवर ताव मारण्यासाठी माकड गावालगतच्या शेतशिवारातून गावाकडे येतात. अशातच नागपूर येथील हिंगणा वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या पेंढरी या जंगला लागतच्या गावात कळपापासून भरकटलेल्या एका नर जातीच्या माकडाने धुमाकूळ घातला होता हा माकड गावकऱ्यांवर हल्ला करत होते. पेंढरी येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात या माकडाने आपले बसस्थान मांडले असून तेथील शाळेकरी मुलांवर सुद्धा वारंवार हल्ला करायचा. गावकरी तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या मनात भीतीचे वातावरण पसरल्यामुळे विद्यार्थ्यांचे शाळेत जाणे सुद्धा बंद झाले होते.

स्थानिक पातळीवर वनविभागामार्फत त्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न करण्यात आले मात्र वानराच्या मरकटतेमुळे सर्व प्रयत्न विफल होताना दिसत होते. ज्यावेळी त्याला पकडण्याचे प्रयत्न करण्यात आले त्यावेळेस पेंढरी गावातील ९० ते १०० फूट मोबाईलच्या टॉवरवर माकड आपले बसस्थान मांडात असल्याने त्याला टॉवरवर चढून पकडणे कठीण झाले होते त्यामुळे वनविभागापुढे या माकड पकडणे एक मोठे आव्हान होते.

यामुळे माकडाला जेरबंद करण्याकरिता वर्धेतील पिपल फॉर अँनिमल्स वन्यप्राणी बचाव केंद्राच्या चमूला पाचारण करण्यात आले. मात्र त्यांना सुद्धा या माकडाला पकडण्याकरीता बराच आटापिटा करावा लागला या मोहिमेदरम्यान गावकऱ्यांनी बरीच गर्दी केलेली होती गर्दीला कासावीस होऊन व चिडून माकड बेभान झाले होते व या घरावरून त्या घरावर सतत उड्या मारून हुलकावणी देत होते प्रत्येक व्यक्तीवर हल्ला चढवीत होते.

अखेर दोन तासाच्या प्रयत्नानंतर सदर वानर परत एकदा गावात स्थित मोबाईल टॉवरवर चढले, मोबाईल टावर वर चढून या वानराला पकडने अत्यंत जोखमीचे होते वनविभाग व पिपल फॉर अँनिमल्सच्या चमूने ही जोखीम पत्करून ९० ते १०० फूट वर चढून अखेर या हैदोस घालणाऱ्या वानराला जेरबंद केले व गावकऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला त्यानंतर येथील हिंगणा वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या पेंढरी या जंगला लागतच्या गावात कळपापासून भरकटलेल्या एका नर जातीच्या माकडाने धुमाकूळ घातला होता हा माकड गावकऱ्यांवर वनविभागाच्या स्वाधीन करून दाट जंगलात मुक्त करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here