

पवनार : कधीकाळी संयम आणि शांतीचे प्रतीक असलेल्या पवनारमध्ये गत काही वर्षांत गावठी दारूने थैमान घातले. घराघरांत नशा पोहोचली, तर चौकाचौकात दारू विक्री उघडपणे सुरू होती. स्थानिकांनी तक्रारी केल्या, पण फारसा फरक पडत नव्हता. सेवाग्राम ठाण्याचे नवे ठाणेदार विनीत घागे यांनी पदभार घेताच ‘दारूवाल्यांची सेटिंग’ उद्ध्वस्त केली आणि गावात नवा श्वास फुंकला. ठाणेदार गाडगे यांनी सुरुवातीला पदभार स्वीकारताच गावठी दारू विक्रेत्यांना चांगलाच धडा शिकवत डोक्यावर दारूच्या डबक््या ठेवून त्यांची गावभर मिरवणूक काढली होती. हा प्रकार आजही गावकऱ्यांच्या लक्षात
आहे.
यावेळी त्यांनी अधिक नियोजनबद्ध आणि चातुर्यपूर्ण पद्धतीने मोहीम हाती घेतली आहे. दररोज रात्री, विशेषत: दारू विक्रेत्यांच्या अड््यांवद अचानक घाडी टाकल्या जात आहेत. पोलिसांची गाडी आली की विक्रेत्यांना इशारा मिळतो, हे ओळखून घागे स्वतः दुचाकीवरून दुसऱ्या मार्गांनी थेट संबंधितांच्या घरी पोहोचतात. झाडाझडतीदरम्यान अनेक ठिकाणी दारूचा मोठा साठा हाती लागला आहे.थेट संबंधितांच्या घरी पोहोचतात. झाडाझडतीदरम्यान अनेक ठिकाणी दारूचा मोठा साठा हाती लागला आहे.
पवनार संतांची भूमी आहे. इथं दारूचं विकृत राज्य असणं म्हणजे गावाच्या संस्कृतीचा अपमान आहे. आम्ही केवळ गुन्हेगारांना पकडतोय असं नाही, तर लोकांचा विश्वास पुन्हा मिळवतोय. ही कारवाई फक्त पोलिसांची नाही, ती गावकऱ्यांच्या सहकार्यानेच यशस्वी होते आहे.
– विनीत घागे, ठाणेदार सेवाग्रम
पवनार ही संत विनोबांची तपोभूमी आहे, इथं गावठी दारूचा धंदा सुरू असेल, तर तो अशोभनीय आहे. संतांच्या या कर्मभूमीत दारू विक्री करणाऱ्यांना थेट तुरुंगात टाका. आम्ही बजरंग दलाच्यावतीने पोलिसांच्या या मोहिमेला पाठिंबा देतो.
-बबलू राऊत, जिल्हा संयोजक, बजरंग दल