
देवळी : व्यक्तीला शिवीगाळ करीत लाकडी पाटीने डोक्यावर मारून जखमी केले. तालुक्यातील चिंचाळा येथे ही घटना घडली. गजानन चिंधूजी कवरती (४५) हे आशिष पोराटे याच्या पानठेल्यावर खर्रा आणण्यास गेले होते.
आशीषने खर्रा न देता शिवीगाळ करीत वाद घातला. यावेळी त्याच्यासोबत असलेले नरेश पोराटे, संदीप पोराटे यांनीही शिवीगाळ केली. आशिषने गजानन यांच्या डोक्यावर लाकडी पाटी मारून जखमी केले. गजानन कवरती यांच्या तक्रारीवरून देवळी पोलिसांनी घटनेची नोंद घेतली.