विद्युत प्रवाहाच्या धक्याने शेतकऱ्याचा मृत्यू! सुकळी बाई येथील घटना

वर्धा : शेतात ऊसाच्या पिकाला पाणी ओलण्यासाठी गेला असता जिवंत विद्यूत प्रवाहाच्या तारेला स्पर्श झाल्याने शेतकर्याचा मृत्यू झाल्याची घटना सुकळी बाई येथे घडली. सतिश ज्ञानेशवर पोकळे वय ३१ वर्षे असे मृत शेतकर्याचे नाव आहे.

मृत शेतकरी सतिश याच्याकडे २ एकर उसाची ‌ओलती शेती आहे. हा दररोजप्रमाणे सोमवार (ता. २२) सकाळी १० वाजताच्या दरम्यान ऊसाच्या पिकाला पाणी ओलविण्याकरीता शेतात आला होता. शेतात असलेल्या मोटर पम्प चालु करण्याकरीता पेटीला हात लावताच विद्युत प्रवाहाचा धक्का लागुन सतीशचा जागीच मुत्यू झाला.

या घटनेची तक्रार सांवगी पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली असून सांगवी पोलीस स्टेशनचे जमादार प्रकाश निमजे तपास करीत आहे. घटना स्थळाला वर्धेचे उपविभागीय विद्युत अभियंता उज्जैन कर येळाकेळीचे कनिष्ठ अभियंता बावणकर यांनी घटनास्थळी भेट देऊन तेथील पाहणी केली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here