युवतीच्या चेहऱ्यावर केले तिघांनी ब्लेडने वार! घटनेने खळबळ उडाली; युवकाविरुद्ध गुन्हा दाखल

वर्धा : मैत्रिणीला कपडे देण्यास जात असलेल्या युवतीच्या चेहऱ्यावर कटर आणि ब्लेडचे सपासप वार करीत तिला जखमी केले. आंबेडकर शाळेसमोरील मुख्य रस्त्यावर ही घटना सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती.

3० वर्षीय युवती मागील एका महिन्यांपासून हिंगणघाट येथे वास्तव्यास आली आहे. ती काजी वॉर्ड येथे राहणारी तिची मैत्रिण हिच्याकडे तिचे कपडे देण्यास जात असताना मागाहून भरधाव ट्रिपलसीट आलेल्या तीन युवकानी कटर आणि ब्लेडने तिच्या डोक्यावर वार केले. इतक्यावरच ते थांबले नसून पुन्हा दुचाकी पलटवून समोरुन येत तिच्या चेहऱ्यावर वार करीत तिला मारहाण केली.

युवतीने चेहऱ्यावर स्कार्फ बांधला असल्याने मोठी घटना टळली. युवतीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी अज्जू, पियूव आणि एका अनोळखी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असल्याची माहिती हिंगणघाट पोलिसांनी दिली. सध्या महिला व मुलींवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटना बघता पोलिसांनी अशा आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जनमनातून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here