
वर्धा : क्षुल्लक कारणावरुन उद्भवलेल्या वादात चार जणांनी युवकाच्या घरात शिरुन त्याला मारहाण केली. त्यानंतर जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना शहरातील गोंडप्लॉट परिसरात घडली. गोंडप्छॉटमधील रहिवासी चंद्रशेखर अरुण चौधरी (32) हे 7 जानेवारीला दुपारी स्वतःच्या. एमएच 32 एक्स 5238 क्रमांकाच्या दुचाकीने पावडे चौकात चहा पिण्यास गेले होते. दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी करून ते चहा पीत होते.
दरम्यान बादल कारमोरे याने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. कारमोरे माफी मागून वापस घरी गेले. मात्र, 8 जानेवारीच्या मध्यरात्री अज्ञाताने चंद्रशेखर यांच्या घराचे दार ठोठावले. दरवाजा उघडला असता त्यांना रामनगर येथील रहिवासी अक्षय सोनटक्के, साईनगर येथील अंकित निनावे, लेंडीपुरा येथील मंगेश कोरसे व गोंडप्लॉट येथील बादल कारमोरे बाहेर उभे होते.
त्यांनी शेखर कुठे गेला, त्याला बाहेर बोलवा असे म्हटले. अक्षय व बादल याने जबरदस्ती दरवाजा ढकलून घरात प्रवेश केला. त्यांनी चंद्रशेखरला मारुन टाकण्याची धमकी देत शिवीगाळ केली. या घटनेमुळे परिवारामध्ये दहशत पसरली आहे. त्यानंतर 4 जण त्या ठिकाणवरुन पसार झाले. याप्रकरणी तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी चौघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.
















































