
वर्धा : वर्धा व सिंदी रेल्वे पोलिसांनी सट्टापट्टी व जुगार अड्यावर कारवाई करून 6 जणांना रंगेहात पकडले. वर्धा पोलिसांनी पुलफैले येथील रहिवासी राजू स्वामीनारायण जयस्वाल (43), सोमनाथ पेठोरे (22) आरोपीला ताब्यात घेतले. या आरोपीकडून एकूण 450 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या व्यतिरिक्त पुलफैले येथील रहिवासी संजय यादव शेंडे (50) याच्याकडून 470 रुपये जप्त करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी स्टेशनफैले येथील रहिवासी समीर अबुकर पठाण (40) व शेख अरबाज शेख सलीम (24) यांना अटक केले. या आरोपीकडून 1 हजार 245 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सिंदी (रेल्वे) पोलिसांनी समुद्रपूर तालुक्यातील कांदळी येथील रहिवासी गजानन लक्ष्मण फुसे (33) या आरोपीला अटक करून त्याच्याकडून 390 रुपयांचा माल जप्त केले. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस करीत आहेत.