क्षुल्लक वादातून झालेल्या हाणामारीत युवकाचा मृत्यू! पुलगाव ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल

पुलगाव : दुचाकीला कट लागल्याने झालेल्या वादात युवकाला जबर मारहाण केल्याने युवकाचा मृत्यू झाल्याने आरोपीविरुद्ध पुलगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असे असले तरी मृृतकाची हत्या नसून त्याचा अतिमद्यसेवनाने मृत्यू झाल्याच्या चर्चेने गावात उधाण आल्याने याचे वास्तव पोलिसांनी उजेडात आणण्याची गरज निर्माण झाली आहे.

मृतक आकाश घरडे हा एम. एच, ३२ ए. जी. ३७१४ क्रमांकाच्या दुचाकीने जात असताना आरोपी प्रशांत सुखदेव टिपले (रा. गांधीनगर) याच्या एम. एच. ३२ ए.ए.१३४७ क्रमांकाच्या दुचाकीला कट लागला. या कारणातून प्रशांतने आकाशला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. तसेच त्याच्या पोटावरही मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी ज्योती सागर घरडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. मात्र, आकाश घरडे याला दारूचे व्यसन जडले असून, त्याचा मृत्यू अतिमद्यसेवनाने झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. शवविच्छेदन अहवालानंतर सत्य बाहेर येणार आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक शैलेश शेळके करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here