लहान मुलांमध्ये जागरुकता निर्माण करणे गरजेचे! विनीत घागे; विवेकानंद इंटरनॅश्नल स्कूलचे वार्षीक स्नेहसंमेलन

पवनार : दिवसेनदिवस गुन्ह्याचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे लहान मुलींमध्ये जागरुकता निर्माण करणे गरजेचे आहे. त्यांना गुड टच, बॅड टच याविषयीचे ज्ञान असने आवश्यक आहे. शाळेत ह्या सर्व गोष्टी शिक्षकांनी मुलींना शिकवून जागरुक केले पाहिजे जेनेकरुन लहान मुलींच्या अज्ञानाचा फायदा कुनालाही घेता येणार नाही. वर्गात पास होण्यापुरते शिक्षण घेणे कामाचे नाही. विद्यार्थ्यांनी शिक्षकांना स्वस्त बसू देवू नये प्रश्न विचारुन आपल्या ज्ञानात भर घालावी असे प्रतिपादन सेवाग्राम पोलिस स्टेशनचे ठाणेदार विनीत घागे यांनी केले. स्वामी विवेकानंद इंटरनॅश्नल स्कूलच्या आयोजीत वार्षीक स्नेहसंमेलनात ते बोलत होते.

यावेळी शाळेचे संचालक डॉ. गजानन पिसूळकर, मुख्याध्यापक सुनील भोयर, माजी सरपंत अजय गांडोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री घागे पूढे बोलताना म्हनाले की सायबरविषयी जागरुक होने गरजेचे आहे. रोज फसवणूकीच्या घटना घडतात आणि सामान्य नागरीक मोहात पडून स्वता:ची फसवणूक करुन घेतात. लॉटरीचे तिकीट खरेदी केल्याशीवाय कुणालाही लॉटरी लागत नाही. कुणी २ हजारात ओएलएक्सवर गाडी विकत नाही. त्यामुळे अशा थापांना बळी न पडता सावध राहुने गरजेचे आहे असे यावेळी त्यांनी सांगीतले.

मुख्याध्यापक सुनील भोयर बोलताना म्हनाले की या शाळेने आजवर अनेक विद्यार्थ्यांना घडवले कुणी डॉक्टर तर कुणी इंजीनियर अशा मोठमोठ्या पदावर गेले. शाळेत केवळ शैक्षणीकच नाही तर विद्यार्थ्यांच्या सार्वांगीन विकासावर भर दिला जातो. या शाळेत अभ्यासासोबतच, कराटे, मैदानी खेळ अशा अनेक नवनविन गोष्टी विद्यार्थ्यांना शिकविल्या जातात. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्यातील सुप्त गुणांचे सादरीकरण केले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी दिंडी, राजस्थानी नृत्य, आर्मी डांस, पोलिस डांस श्री राम यांचे आगमन, आदिवासी नृत्य अशा अनेक सादरीकरणाने सर्वांंचे लक्ष वेधले होते. कार्यक्रमाकरीता उपमुख्याध्यापीका कीर्ती मिश्रा, प्रवीण झटाले, विजया तारपुरे, रोशनी अवचट यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here