एक विवाह असा ही नवरी चढली घोडयावर! वर्ध्यात निघाली आगळीवेगळी वरात; वरातीची सर्वत्र चर्चा

राहुल काशीकर

वर्धा : लग्न म्हटल की घोड्यावर फक्त नवरदेवच बसतो, असे चित्र आपल्याकडे आहे. म्हणजे नवरदेवानेच घोड्यावर बसावे, अशी पुरुषप्रधान रुढी आपल्याकडे सर्वश्रुत आहे. परंतु मुलगा व मुलगी यांतील भेदभावाच्या दरीला सुरुंग लावत मुलीची हळदीची मिरवणूक घोड्यावर काढून नव्या पुरोगामी विचाराची प्रेरणी गोविंद नगरातील चद्रकांत उभाड या वधु पित्याने शनिवारी ही मिरवणूक काढली.

सध्या हाच विषय शहरात चर्चेचा ठरला आहे. मुलामध्ये आणि मुलीमध्ये आपण कोणताही भेद पाळत नसल्याचे त्यांनी कृतीतून सर्वांपुढे मांडले. येथील नगरपरिषद मुख्याध्यापक पदावर कार्यरत असलेल्या चद्रकांत उभाड यांना एक मुलगा एक मुलगी आहेत. मोठी मुलगी नुपूर हिने अभियंता पदवी घेतली असून ती सद्या पुणे मध्ये नोकरी करते आहे. दरम्यान मूळचा वाढोना येथील मुलासोबत नुपूरचा विवाह ठरला आणि हा विवाह थाटामाटात रविवारी 7 फेब्रुवारी सकाळी 11 शहरात पार पडला. दरम्यान, विवाहाच्या पूर्वसंध्येला नवरदेव राशी निघतो आणि घोड्यावर बसतो, असेच चित्र आतापर्यंत आपल्या भागात आपण आतापर्यंत पाहत आलेले आहोत. मात्र चंद्रकांत उभाड यांनी मुला मुलीत भेद पाळायचा नाही, असे ठरवून नुपुरला हळदीच्या दिवशी चक्क घोड्यावर बसवून मिरवणूक काढली.

सुरूवातीला घोड्यावर बसण्यासाठी नुपूर काहीशी घाबरली मात्र तिच्या भवानी तिला धीर दिला. भावाच्या इच्छेला कुठेही छेद द्यायचा नाही म्हणून तिने हिम्मत दाखवली आणि थेट नवरी घोड्यावर बसली. नवरदेवाच्या वरातीत ज्याप्रमाणे बॅन्ड, फटाक्यांची आतषबाजी त्याचप्रमाणे या हळदीच्या वरातीतही पहायला मिळाली. ऊलट अलीकडे नवरदेवाच्या वरातीमागे मोजकेच नातेवाईक व लोकांची गर्दी दिसते मात्र नुपूर घोड्यावर बसलेली असताना परिसरातील नागरिकांची प्रचंड गर्दी दिसत होती. विशेष उभाड याच्या कुंटूबातील अशा प्रकाची ही दुसरी घटना आहे. या आधी ही नुपूरची मावस बहीण चे 2 वर्षा आधी असेच घोड्यावर बसून मिरवणूक काढली होती. ही आगळीवेगळी वरात पाहून आजूबाजूचे सर्व नागरिक कुतूहलाने या वरातीकडे पाहत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here