उर्सच्या निमित्त्याने आमदारांचा भव्य सत्कार! पवनार दर्गा परिसर सैदर्यीकरनाला निधी मंजूर; कमिटीच्या वतीने केला आभार व्यक्त

पवनार : येथील हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक असलेला हजरत सय्यद अहेमद कबीर (र.अ.) दरगाह येथे येथील ट्रस्टचे अध्यक्ष इंजि. अलताफ अली यांनी दरवर्षीप्रमाणे ऊर्सच्या कार्यक्रमाचे आयोजित केले होते. या ऊर्समध्ये हजारोचे संख्याने, हिन्दू-मुस्लिम बांधव उपस्थित होते. यावेळी शाही संदल काढण्यात आला होता. भावीकांना लंगर वितरीत करण्यात आला होता. यावेळी आमदार डॉ. पंकज भोयर, भाजपा अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष शब्बीर अली सय्यद, सामाजीक कार्यकर्ता शेख सलीम, सरपंच शालीनी आदमने, उपसरपंच राहुल पाटनकर, ग्रामपंचायत सरपंच सदस्य राजेंद्र बावने, माजी बांधकाम सभापती व नगरसेवक शेख नौसाद शेख रज्जाक यांची प्रमुख उपस्थिती होती.

आमदार डॉ. पंकज भोयर यांनी दर्गचे रोडचे कामा करिता १.५ कोटी व सौदर्य करणाचे कामाकरिता २ कोटीचा निधी, आमदार विशेष निधी २०२३-२४ अर्तगत इेलेक्ट्रिकचे काम व सॉदर्यंकरणचे काम मंजूर केल्याबद्दल यावेळी ट्रस्ट कडुन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कमीटीचे अध्यक्ष इंजि. अलताफ अली, उपअध्यक्ष शॉकत अली, कोषाअध्यक्ष अमानुल्लाखान, ट्रस्टी सय्यद युसुफ, अब्दुल सत्तार (पहेलवान), शेख हमीद, हाजी आसीफ अली, शेख आरीफ (राजा), आरीस अली, मुजाहिद अली, शेहजाद पेंटर, विक्रम पाहुणे, रामदास वाघमारे सुनिल पेटकर, विनायक पाहुणे, अब्राईल खान, अहमद अली, सतीश रघाटाढे, गुडूडु बोकडे, प्रनाल काकडे, किशोर गुजर, मुकुन्दा मसराम, अजिश कुरेशी, अमोल बोकडे, ईकबाल कुरेशी, शंकर बावणे, रमेश राऊत, नामदेव मार्हले, प्रतिक वाघमारे, शेख ईददु भाई, निशाद भाई , सोनु भाई, अमजद खान, नुर मोहम्मद खान यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here