

गिरड : वादात मध्यस्थी गेल्याने झालेल्या भांडणात युवकास काठीने मारहाण करीत जखमी करण्यात आल्याची घटना अंतरगाव येथे घडली.
जगदीश भुजाडे याचा त्याच्या आईवडिलांशी वाद सुरु होता. दरम्यान सचिन उर्फ गोलू चौधरी हा वाद सोडविण्यास मध्यस्थी गेला असता जगदीशने त्यास शिवीगाळ केली. काही वेळानंतर जगदीश चौकात उभा असताना सचिन चौधरी याने त्याला अडवून तु मगाशि जास्त का बोलला, असे म्हणून शिवीगाळ करीत काठीने मारहाण केली, याप्रकरणी गिरड पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.