

वडनेर : क्षुल्लक वादातून युवकास त्याच्या पत्नीला आणि आईला मारहाण करीत जखमी करण्यात आले. ही घटना काचनगाव येथे घडली.
संतोष डफ आणि विनोद डफ हे रवींद्र खोडे याला शिवीगाळ करीत होते. रवींद्रने शिवीगाळ करण्यास हटकले असता दोघांनी लाथाबुक्क्यांनी तसेच रॉडने मारहाण केली. दरम्यान रवींद्रची आई व पत्नी वाद सोडविण्यास मध्यस्थी गेली असता तिलाही मारहाण करण्यात आली. वडनेर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.