ज्वेलरी शॉपला चोरट्याने केले टार्गेट! ३.०५ लाखाचा मुद्देमाल लंपास : परिसरात खळबळ

हिगणघाट : येथील एका ज्वेलरी शॉपसह मेडिकल्सला चोरट्याने टार्गेट करून या दोन्ही दुकानांमधून तीन लाख पाच हजाराचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली असून, या घटनेमुळे गाव व परिसरात चोरट्यांबाबत कमालीची दहशत निर्माण झाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, स्थानिक बाजारपेठेतील गुरुश्री ज्वेलर्स तसेच श्रीराम मेडिकल्स या दोन दुकानात चोरट्यांनी हात साफ केला. ज्वेलरीच्या दुकानातून चोरट्यांनी तीन लाखाचा तर मेडिकल्स शॉपमधून पाच हजाराचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला. ऐन बाजार ओळीतील दुकानांमध्ये चोरी झाल्याचे शुक्रवारी सकाळी उघडकीस येताच घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती.

माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनास्थळाची बारकाईने पाहणी करीत पंचनामा केला. पुढील तपास ठाणेदार राजेंद्र शेट्टे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सोनपितळे करीत आहेत. चोरट्यांच्या शोधार्थ वडनेर पोलिसांच्या सुमारे तीन चमू रवाना करण्यात आल्या आहेत. लवकरच चोरट्यांना जेरबंद करून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करून असा विश्वास सध्या पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here