लोककल्याणाचा विचार केल्यास देशसेवा घडेल! एस. राघवन

हिंगणघाट : मला देशासाठी काहीतरी करावेसे वाटते पण सुरुवात कुठून करावी हे सुचत नाही असे म्हणणाऱ्या लोकांनी किमान एक झाड लावावे म्हणजे देशकार्याला आपले हात लागतील. शासकीय सेवेत सेवा देताना आपण आपले कर्तव्य बजावत असतो पण याच सेवेचा उपयोग जेव्हा लोककल्याणासाठी होतो तेव्हा खऱ्या अर्थाने देशसेवा होते असे प्रतिपादन राघवन यांनी केले.

पर्यावरण संवर्धन संस्थेने हिंगणघाट ते वर्धा रोडच्या रूंदीकरणाचे कामात वेळा ते कवडघाट दरम्यान असलेल्या झाडांची कत्तल न होऊ देता २५० कडूनिंबाची मोठी झाडे वाचविली.

या कामी श्री राघवन अतिशय सात्विकपणे मदत केली. श्री. राघवन हे मुळचे चेन्नईचे असल्याने त्यांचा हिंगणघाटशी कुठलाही संबध नसूनही आत्मियतेने मदत केली. ते या रस्ता बांधकामाचे प्रकल्प व्यवस्थापक असुनही त्यांनी आपल्या अधिकाराचा बाऊ न करता पर्यावरण रक्षन ही प्रत्येकाची सारखी जबाबदारी आहे हे लक्षात घेऊन संस्थेच्या अभियानाला सहकार्य केले. ऊतराई व्हावे म्हणून पर्यावरण संवर्धन संस्थेच्या वतिने स्नेहल नर्सरीचे मालक वनश्री सन्मान प्राप्त दिगांबरजी खांडरे यांचे हस्ते राघवन साहेबांचा मानचिन्ह व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी लोक साहित्य परिषदचे राजूभाऊ कोंडावार, डाॅ. प्रा. रविन्द्र ठाकरे, नगरसेवक सूनिल डोंगरे, सर्वोदयी रमेश झाडे या मान्यवराची समयोचित मोलाची भाषणे झाली. वक्त्यांनी सत्कार मुर्तीचे आभार देखील मानले.

ज्ञानेश्वर चौधरी लोक साहित्य परिषदेचे सचिव अध्यक्षस्थानी होते. पर्यावरण संवर्धन संस्थेचे अध्यक्ष आशिष भोयर यांनी प्रस्ताविकात पाहूण्यांचा परिचय व त्यांनी केलेल्या सहकाराची जाणिव करून देत प्रगतीचा आढावा सादर केला. कार्यक्रमाचे सुरस संचालन लो.सा.प.चे उपाध्यक्ष प्रा.अभिजीत डाखोरे यांनी तर आभार प्रदर्शन गोपाल मांडवकर सरांनी केले.

या प्रसंगी विविध संस्थांचे पदाधिकारी व स्नेहल नर्सरीचे शशांक खांडरे, शुभांक खांडरे, प्रा.डाॅ. श्रीकृष्ण बोढे, प्रा. सतीष चौधरी, अँड.ओमप्रकाश भोयर, सचिन थुल, हेमंत हिवरकर, हेमंत महाजन, अमोल क्षिरसागर, वृक्षमित्र परिवारचे नीतीन क्षिरसागर, राहूल सिंगरू, दर्शन बाळापुरे, साकिब शेख, नगर परिषद सदस्य धनंजयभाऊ बकाने, प्रमोद माथनकर, सुनिल अराडे, धनराज कुंभारे, किशन माथनकर, पत्रकार सनी बासनवार, निलेश बलखंडे यांचे उपस्थितीत कार्यक्रम स्नेहल नर्सरी या निसर्गरम्य परीसरात संपन्न झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here