अल्पवयीन मुलींच्या विनयभंग प्रकरणी आरोपीला 3 वर्षांचा सश्रम कारावास! अतिरिक्‍त विशेष जिल्हा न्यायालयाचा निकाल

वर्धा : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपी यश धर्मपाल मुन (20, सोनेगांव आबाजी, ता. देवळी) यास 3 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा व दंड रूपये 3 हजार रुपये व दंड मन भरल्यास अतिरीक्त 3 महिन्याच्या साध्या कारावासाची शिक्षा येथील अतिरिक्त विशेष जिल्हा न्यायाधीश-1, चे व्ही. टी. सूर्यवंशी यांनी ठोठावली.

घटनेची थोडक्यात हकीकत अशी की, यातील पीडिता ही कॉलेजला जाण्याकरीता गावावरून ओटोरिक्षाने जाणे- येणे करत होती. कॉलेज सुटल्यानंतर घरी जाण्याकरीता ऑटोरिक्षा स्टँड देवळी येथे आली. गावाला जाणाऱ्या ऑटोमध्ये बसली. मोबाइल पाहात असताना आरोपी यश मुन तेथे आला त्याने पीडितेचा हात पकडून तिचा मोबाईल हिसकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ऑटोतील महिला आरोपीवर रागावली. त्यानंतर आरोपी तेथून निघून गेला. पीडिता आरोपीला शाळेत असल्यामुळे ओळखत होती. घरी आई- वडील कामावरून घरी परत आल्यावर त्यांना घडलेली घटना सांगितली. त्यानंतर त्याच दिवशी पीडितेने तिच्या आई-वडीलांसोबत पोलिस स्टेशन गाठले. देवळी येथे येऊन आरोपीविरूध्द तक्रार केली. तक्रारीवरून प्रकरणाचा तपास महिला पोलिस उपनिरीक्षक सोनाली राठोड यांनी केला. तपासादरम्यान आरोपीने गुन्हा केल्याचा सबळ पुरावा उपलब्ध झाल्यामुळे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here