मालवाहू ट्रकच्या धडकेत कारचा चुराडा! युवक गंभीर

वर्धा : आर्वी तालुक्‍यातील मांडला फाट्याजवळ मालवाहू ट्रक आणि कारमध्ये समोरासमोर धडक झाली. यामध्ये कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, युवक गंभीर जखमी झाला. हा अपघात रविवारी झाला असून, जखमीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

विनोद चंदू चव्हाण (२७, रा. रानवाडी) असे जखमीचे कारचालकाचे नाव आहे. तो (एमएच ०४ डीएन ३२९१) क्रमांकाच्या कारने रानवाडी येथून आर्वीकडे जात होता. यादरम्यान मांडला फाट्याजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या (एमएच ३४ बीझेड ५०४४) क्रमांकाच्या मालवाहू ट्रकच्या चालकाने कारला धडक देऊन पसार झाला. अपघाताची माहिती मिळताच तळेगाव पोलिसांनी ट्रक चालक रवींद्र शांताराम डोलींकर (५०, रा. चिचाळा, जि. चंद्रपू) याला ताब्यात घेतले. कारचालक विनोद गंभीर जखमी असल्याने त्याला उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल कले. या अपघातामध्ये कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here