१६ वर्षांखालील १६०१, १६ ते ३५ वयोगटातील १०१०८ रुग्ण, मात्र, अद्याप कोरोना लसीकरण नाही ! १८ वर्षांवरील सर्वांना मिळेल १ मे पासून लस; १६ वर्षांखालील मुलांना प्रतीक्षाच

वर्धा : कोरोनाच्या पहिल्या लाटेत १६ वर्षांखालील तसेच १६ ते ३५ वयोगटातील रुग्णांचे प्रमाण नगण्य होते. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाने १६ वर्षांखालील मुले आणि १६ ते ३५ वयोगटातील नागरिकांनाही कवेत घेतल्याचे चित्र आहे.

गतवर्षीपासून देशभरासह राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. मात्र, वर्धा जिल्हा ९ मे पर्यंत कोरोनामुक्तच असल्याने ग्रीन झोनमध्ये समावेश करण्यात आला होता. यावर्षी मार्च महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असून लहान मुले, युवकांनाही कोरोनाने डंख मारला आहे. ४५ वर्षांवरील आणि ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणाची प्रक्रिया सुरू आहे.
मात्र, १६ वर्षांखालील मुले आणि १६ ते ३५ वर्षे वयोगटातील रुग्णांना अद्याप लसीकरण नाही. कोरोनावर मात करण्यासाठी १ मे पासून देशभरात १८ वर्षांवरील सर्वांनाच लस देण्यात येणार आहे. त्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाकडून नियोजन केले जात आहे. जिल्ह्यात १६ वर्षांखालील १ हजार ६०१ रुग्ण आहेत. १६ ते ३५ वयोगटातील १० हजार १०८ तर १६ ते ४५ वयोगटातील १५ हजार ७९९ रुग्ण आहेत.

केंद्र सरकारने १८ वर्षांवरील सर्वांनाच १ मे पासून लस देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे या वयोगटातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.मात्र, १६ वर्षांखालील आणि त्यावरील वयोगटातील मुलांना कधी लस दिली जाणार हे अद्याप सांगता येणार नसल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

1 / 3
Caption Text
2 / 3
Caption Two
3 / 3
Caption Three

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here