व्यायाम शाळेला ३ लाख ८५ हजाराचा निधी उपलब्ध : उपसरपंच पाटणकर यांच्या पाठपुराव्याला यश; पालकमंत्र्यांचे निवेदनातून वेधले होते लक्ष

राहुल काशीकर

पवनार : नियमित व्यायाम ही चांगल्या आरोग्याची गुरुकिल्ली आहे. युवा पिढीचे आरोग्य चांगले असावे, यासाठी तालुका व गाव पातळीवर व्यायाम शाळा असतात पवनार येथील युवापिढी आपले शरीर व आरोग्य चांगले राहावे यासाठी महारुद्र व्यायाम शाळेत जाऊन नियमित व्यायाम करीत होते मात्र व्यायामशाळेत अपुरे साहीत्य असल्याने व्यायाम करने अवघड होत होते त्यामुळे येथील युवकांनी व्यायाम शाळेत पुरेशे साहित्य उपलब्ध करून द्यावे अशी मागणी उपसरपंच राहुल पाटणकर यांच्याकडे केली होती. ही बाब उपसरपंच यांनी १ वर्षाआधी पालकमंत्री सुनील केदार यांना निवेदन देऊन याकडे त्यांचे लक्ष वेधले होते.

उपसरपंच राहुल पाटणकर यांच्या पाठपुरवठ्याला यश आले आणि येथील व्यायामशाळेला ३ महिन्या अगोदर ३ लाख ८५ हजाराचा निधी मंजूर झाला. २ मार्च रोजी पवनार येथील महारुद्र व्यायाम शाळेत सरपंच शालिनी आदमने, उपसरपंच राहुल पाटणकर, ग्रामविकास अधिकारी श्री डमाळे यांच्या हस्ते येथे उपलब्ध साहित्याचे पुजन करण्यात आले.

३ लाख ८५ हजार रुपयाच्या निधीमधुन पाच स्टेशन मशीन, चेस्ट टेबल, डम्बेल्स, चेस्ट प्लेट, ब्याक मशीन आदी साहित्य उपलब्ध करून दिले. यावेळी ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, संदीप हिवरे, किरण गोमासे, अमोल देवताळे, रज्जत वैद्य, सौरभ बोरकर, भूषण वाटमोडे, प्रज्वल हजारे आदीची उपस्थिती होती.

प्रतिक्रिया…

येथील व्यायाम शाळेत युवोकांना व्यायाम करण्यासाठी पुरेसे साहित्य नसल्याने व्यायाम होत नव्हवता ही बाब लक्षात घेऊन व्यायाम शाळेसाठी साहित्य मिळून देण्यासाठी १ वर्षा अगोदर वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांना निवेदन देऊन व्यायाम शाळेतील आवश्यक असलेल्या साहित्याची मागणी लावुन धरली होती ती पूर्ण झाल्याने आज मनाला खुप समाधान आहे.

राहुल पाटणकर, उपसरपंच पवनार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here