मुलाने आईस मारली तेलाची किटली! पोलिसांत तक्रार दाखल

तळेगाव : जेवणात शिळी भाजी का दिली म्हणून संतापलेल्या मद्यपी मुलाने आईच्या डोक्याला तेलाची किटली फेकून मारली; तसेच वडिलांना तारेच्या कुंपणावर ढकलून देत जखमी केले. ममदापूर गावात ही घटना घडली.

रंजना रमेश भालचक्र ही घरी असताना मोठा मुलगा प्रमोद हा मद्यधुंद अवस्थेत घरी आला. त्याला जेवण वाढले असता त्याने मी रात्रीची भाजी नाही खात, दुसरी भाजी करून दे, असे म्हणून वाद घातला. रंजनाने समजाविण्याचा प्रयत्न केला असता तिला धक्काबुक्की करून तेलाची किटली डोक्यावर मारली. दरम्यान पती रमेश हे वाद सोडविण्यास, मध्यस्थी करण्यास गेले असता त्यालाही ढकळून तारेच्या कुंपणावर ढकलून दिले. या प्रकरणी तळेगाव पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here