पेपर सोडवून येणाऱ्या विद्यार्थिनींना कारने चिरडले! दोघी गंभीर तर एक किरकोळ जखमी

आर्वी : अंतिम वर्षाचा पेपर सोडवून बसस्थानकाकडे जात असलेल्या तीन विद्यार्थिनींना भरधाव कारने चिरडले. हा अपघात बसस्थानक परिसराकडे जाणाऱ्या मार्गावर १५ रोजी सायंकाळी ६:१५ वाजताच्या सुमारास झाला. दोन विद्यार्थिनी गंभीर जखमी असून, त्यांना अमरावती येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असल्याची माहिती डॉ. नरेंद्र गुप्ता यांनी दिली. तर, एक विद्यार्थिनी किरकोळ जखमी झाली. याप्रकरणी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

तनुश्री मनोहर झटले, सोनू राऊत असे गंभीर जखमींची नावे आहे तर स्नेहल रामदास नांदणे सर्व रा. तळेगाव ही किरकोळ जखमी असल्याची माहिती आहे. तळेगाव येथील वाय. जे. महाविद्यालयातील विद्यार्थिनींचा १५ रोजी आर्वी येथील आर्टस अँण्ड कॉमर्स कॉलेजमध्ये अंतिम वर्षाचा पेपर होता. पेपर सोडवून तळेगाव येथे जाण्यासाठी वर्धा टी पॉइंटवरून बसस्थानकाकडे पायदळ जात होत्या. दरम्यान, नागपूर येथून आर्वीला आलेले डॉगरे नामक शिक्षकाने वर्धा टी पॉइंटवर चालकाला उतरवून स्वतः गाडी चालवित असतानाच एक्सिलेटरवर पाय पडल्याने कार समोर उभ्या तीन मुलींच्या अंगावर गेली आणि थेट वीज खांदावर जाऊन धडकली. तमुश्रीच्या डोक्याला गंभीर मार लागला. सोनूच्या खांद्याला गंभीर मार लागला. तर, स्नेहल नांदणे ही किरकोळ जखमी झाली. पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here