रस्ता सुरक्षा सप्ताहानिमीत्य स्कूल व्हॅन रॅली! आरटीओ आणि वाहतूक शाखेचा उपक्रम

वर्धा : रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, वाहतूक शाखा विभाग वर्धा यांच्या संयुक्त विद्यमानाने स्कूल व्हॅन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये स्कूल बस चालक संघटनेतर्फे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मोठ्या संखेने स्कूल बस चालकांनी या रॅलीत आपला सहभाग नोंदविला होता. यावेळी मोटार वाहन निरीक्षक साधना कवळे, वाहतूक शाखेचे निरीक्षक श्री चकाते यांनी हिरवी झेंडी दाखवत या रॅलीला सूरवात केली.

रस्ता सुरक्षा सप्ताहानिमीत्त उपप्रादेशीक परिवहन विभागाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. माणवीचूकांमुळे वाहन अपघातात मोठ्या प्रमाणात निरप्राध लोकाचंचे नाहक बळी जातात. या अपघातांना आळा घालण्यासाठी ठिक ठिकाणी वाहन चालकांचे समुपदेशन केले जात आहे. रक्तदान शिबीर, हेल्मेट रॅली, पथनाट्य अशा विविध माध्यमातून जनजागृती करुन अपघात टाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here