लैंगिक अत्याचार करणाऱ्यास दंडासह सश्रम कारावास! आरोपी हा पीडिताचा नातेवाईकच

वर्धा : अल्पवनीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या आरोपीस दंडासह सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. हा निकाल जिल्हा सत्र न्यायालयाने दिला आहे. राजस्थान राज्यातील बिजनाखेडी येथील मूळ रहिवासी असलेला तसेच सध्या कारंजा तालुक्यातील एका गावात वास्तव्य करणाऱ्या ४५ वर्षीय आरोपीला बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ व ८ नुसार तीन वर्षांचा सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास तीन महिन्यांचा सश्रम कारावास, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ११ (आय) व १२ नुसार दोन वर्षांचा सश्रम कारावास व दोन हजार दंड तसेच दंड न भरल्यास दोन महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा तसेच भादंविच्या कलम ४५१ नुसार एक वर्षाचा सश्रम कारावासाची शिक्षा व एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिन्याचा सश्रम कारावास, भादंविच्या कलम ३५४ अन्वये सहा महिन्यांचा सश्रम कारावास व ५०० रुपये दंड आणि दंड न भरल्यास १५ दिवसांच्या सश्रम कारावासाची शिक्षा अतिरिक्त विशेष जिल्हा न्यायाधीश-१ व्ही.टी. सूर्यवंशी यांनी ठोठावली आहे. दंडापैकी पाच हजार रुपये पीडितेला देण्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, आरोपी हा पीडिताच्या आत्याचा पती असून, तो पीडिताच्या घराशेजारीच राहतो. त्याने पीडिताच्या घरी कुणी नसल्याची संधी साधून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी कारंजा पोलिसांत तक्रार दाखल झाल्यावर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेतली. तपासाअंती पोलीस उपनिरीक्षक पूनम कोरडे यांनी प्रकरण न्यायप्रविष्ट केले. न्यायालयात चार साक्षदारांची साक्ष तपासण्यात आली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद आणि पुरावे लक्षात घेऊन न्यायाधीश सूर्यवंशी यांनी आरोपीला वरील शिक्षा ठोठावली. शासकीय बाजू अँड. विनय आर. घुडे यांनी मांडली, तर पैरवी अधिकारी म्हणून चंद्रकांत भवरे यांनी कामकाज पाहिले. दंडापैकी पाच हजाराची रक्कम पीडितेला नुकसानभरपाई म्हणून देण्याचेही न्यायाधीश सूर्यवंशी यांनी दिलेल्या निर्णयात नमुद केले असल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here