अपहरण करून अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण! गर्भधारणा झाल्याने प्रकार उघड

वर्धा : पीडितेस लग्नाचे आमिष दाखवून २१ वर्षीय युवकाने पळवून नेत मीरा रोड, वसई येथील एका घरी नेऊन तिचे लैंगिक शोषण केले. पीडितेला गर्भधारणा झाल्याने ही धक्कादायक बाब उघडकीस आली असता कोंढळी येथे याप्रकरणाची तक्रार दाखल करण्यात आली. मात्र, आरोपी हे खरांगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्याने प्रकरण खरांगणा पोलिसांत वर्ग करून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

नागपूर जिल्ह्यातील एका गावातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला आरोपी केवल दरबार गुंदी (२१) रा. आकोली याने लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेत मीरा रोड, वसई, विरार येथे घेऊन गेला. तेथे पीडितेचे वांरवार लैंगिक शोषण केले. दरम्यान पीडितेला आठ महिन्यांची गर्भधारणा झाली. दरम्यान, रुक्साना किरण राठोड हिच्या बहिणीने पीडितेच्या आईच्या मोबाईलवर फोन करून कुणालाही सांगितल्यास मुलीला जिवे ठार मारण्याची धमकी दिली.

अखेर याप्रकरणी पीडितेच्या आईने कोंढळी येथील पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तक्रार नोंदवून दोन्ही आरोपी हे. खरांगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्याने प्रकरण खरांगणा पोलिसांत वर्ग केले. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत केवल दरबार गुंदी, रुक्साना किरण राठोड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here