

वर्धा : मानसिक तणावात असलेल्या मद्यपी व्यक्तीने स्वत:च्याच घराला आग लावून पेटवून दिले. यात घरातील इतर साहित्यासह लाकूडफाटा जळून खाक झाला. सुदैवाने कुठलीही जिवीतहानी झाली नाही. आर्वी येथील आंबेडकर वॉर्ड परिसरात ही घटना घडली.
किसना नारायण कळंबे याला दारुचे व्यसन जडले आहे. याला कंटाळून त्याच्या पत्नीसह इतर नातेवाईक त्याला सोडून गेले. त्यामुळे तो घरात एकटाच तणावात राहत होता. अचानक घराशेजारी असलेल्या विठ्ठल मडावी याला किसनाच्या घराला आग लागल्याचे दिसले. त्यांनी परिसरातील नागरिकांनी आग विझविली असता त्याला आग कुणी लावली याबाबची विचारणा केली असता किसनाने मला मरायचे आहे, असे सांगून स्वतःच आग लावल्याचे सांगितले. यात घरातील साहित्य व लाकूडफाटा जळून खाक झाला. याप्रकरणी विठ्ठल मडावी याने देवळी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे.