मुलीचा पाठलाग; घरच्यांना केली जातीवाचक शिवीगाळ

वर्धा : अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन तिच्याशी असभ्य वर्तन करीत त्यानंतर तिच्या घरासमोर जात आईवडिलांना जातीवाचक शिवीगाळ करणे तिघांना चांगलेच महागात पडले असून देवळी पोलिसांनी तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्याची माहिती दिली आहे.

मोहन करलुके, १७ वर्षीय मुलगी ही रस्त्याने तिच्या मैत्रिणीसोबत शाळेत जात असताना आरोपी मोहन रमेश करलूके, प्रदीप दिलीप आत्राम आणि दीपक बबन कामतकर हे तिघे दुचाकीने तिचा पाठलाग करीत होते. दरम्यान तिला रस्त्यात अडवून मोहन करलूके याने तू प्रदीप आत्रामशी लग्न कर, असे म्हणत तिच्याशी असभ्य वर्तन करुन तेथून निघून गेले.

काही वेळाने मोहन करलूके हा मित्रांसह पुन्हा पीडितेच्या घरासमोर गेला आणि जोरजोरात शिवीगाळ करु लागला. दरम्यान पीडितेच्या घरच्यांनी हटकले असता तिघांनी तिच्या घरच्यांना जातीवाचक शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पीडितेने देवळी पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी विनयभंगासह अँट्रॉसिटी अंतर्गत गुन्ह्याची नोंद करुन तिन्ही आरोपींना अटक केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here