नगर परिषद येथे दिव्यांगांसाठी युडीआयडी स्मार्ट कार्ड नोंदणी! 6 व 7 जुन रोजी करता येणार नोंदणी

वर्धा : वर्धा शहरातील दिव्यांग व्यक्तींसाठी विविध योजना राबविण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या दिव्यांग व्यक्तींनी दिव्यांगत्वाची नोंद वर्धा नगर परिषद कार्यालयात केलेली आहे. परंतु काही दिव्यांग व्यक्तींनी जिल्हा शल्य चिकित्सकाचे प्रमाणपत्र सादर केलेले नाहीत तसेच काही अपंग व्यक्त्तींच्या नावाची नोंद झालेली नसेल अशा व्यक्तीच्या नावाची नोंद व युडीआयडी स्मार्ट कार्ड नोंदणी करण्याची कारवाही दि.6 व 7 जुन रोजी करण्यात येणार आहे. त्यामुळे दिव्यांग व्यक्तींनी युडीआयडी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

यासाठी दिव्यांग व्यक्तींनी अंपगत्वाचे 40 टक्केचेवर असलेले प्रमाणपत्र, आधारकार्ड सोबत घेऊन नगर परिषद येथे उपस्थित राहावे. यासाठी दिव्यांग व्यक्तींना प्रवास भाडे रुपये 50 रुपये प्रदान करण्यात येणार आहे. ज्या दिव्यांग व्यक्तीकडे युडीआयडी स्मार्ट कार्ड नाही अशा दिव्यांग व्यक्तींना कोणत्याही प्रकारचा नगर परिषद कार्यालयाकडून अनुदान व योजनेचा लाभ देता येणार नाही, याची दिव्यांगांनी नोंद घ्यावी, असे मुख्याधिकारी नगर परिषद यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here