घरात घुसून अल्पवयीन मुलीवर बळजबरी केले लैंगिक अत्याचार! आरोपीस ठोकल्या बेड्या; समुद्रपूर येथील घटना

वर्धा : अल्पवयीन मुलीच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश करीत तिच्यावर बळजबरी अत्याचार करण्यात आल्याची घटना समुद्रपूर येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी नराधमास अटक केल्याची माहिती दिली.

१४ वर्षीय पीडिता ही घरात एकटी असताना आरोपी पंकज निरंजन निंदेकर याने पीडितेच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश करुन तिच्याशी बळजबरी अत्याचार केला. पीडितेने आरडाओरड केली असता आरोपी पंकजने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. पीडितेने हा प्रकार घरच्यांना सांगितल्यावर घरच्यांनी थेट पोलीस ठाणे गाठून याबाबतची तक्रार दिली. पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करुन आरोपी पंकज निंदेकर याला अटक केली. पुढील तपास समुद्रपूर पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here