बोरधरण परिसरात युवकाची गळफास घेऊन आत्महत्या! बुटीबोरी पोलिसांत तक्रार दाखल

हिंगणी : नागपूर जिल्ह्यातील खैरी बुटीबोरी येथून शनिवारपासून बेपत्ता असलेल्या युवकाने बोरधरण परिसरातील झाडावर गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी ही घटना उघडकीस आली.

मनोज पांडुरंग बोरले (३५) असे मृत युवकाचे नाव आहे. मनोज खैरी बुटीबोरी येथील रहिवासी असून, तो तेथीलच एका कंपनीत काम करीत होता. शनिवारी कंपनीत कामाला जातो म्हणून घरून डबा घेऊन एम.एच.४०- ३०३७ क्रमांकाच्या दुचाकीने गेला होता. उशीर होऊनही कामावरून परतला नाही म्हणून कुटुंबीयांनी शोध घेतला. मात्र, थांगपत्ता न लागल्याने अखेर बुटीबोरी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.

मनोज हा विवाहित असून, त्याला दोन मुली आहेत. त्याची एक बहीण हिंगणी वेथील ईश्वर गुरनुलेकडे असल्याने हा परिसर ओळखीचा होता. गुरुवारी सकाळी बोरधरण येथील बौद्ध स्तुप परिसरातील कडुलिंबाच्या झाडावर गळफास घेऊन युवकाने आत्महत्या केली असून, झाडाखालीच मोटारसायकल उभी असल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरली. जावयाने घटनास्थळ गाठून पाहणी केली असता मनोज असल्याचा उलगडा झाला. सेलू पोलिसांना माहिती देण्यात आली. त्याच्या पश्चात आई वडील, भाऊ व आप्तपरिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here