सीटी स्कॅन मशीन बंद असतानाही जिल्हा सामान्य रुग्णालयाने पैसे हडपले! सर्वसामान्य रुग्णांना कमालीचा त्रास

वर्धा : वर्धा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या निष्क्रिय प्रशासनामुळे सर्वसामान्य रुग्णांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. रुग्णालयातील सीटी स्कॅन मशीन बंद असतानाही रुग्णाच्या नातेवाइकांकडून सीटी स्कॅनसाठी ४०० रुपये हइपण्यात आले. ते परत न करता सरकारजमा झाले आहेत, असे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकांनी रुग्णाच्या नातेवाइकांना सांगितल्याने या प्रकरणाची तक्रार आरोग्य प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

नालवाडी परिसरातील सपना अनिल वानखडे यांच्या डाव्या पायाला जंभीर दुखापत झाली होती. त्या १० जून रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अस्थिरोग विभागात उपचारासाठी जेल्या. तेथे असलेल्या डॉक्टर इंदूर्कर यांनी त्यांना पहिल्यांदा एक्सरे काढण्यास सांगितले त्यासाठी १५० रुपये भरण्यात आले. त्यानंतर सीटी स्कॅन करण्यास सांगितले. त्याशिवाय उपचार करता येणार नाहीत, अशी माहिती त्यांनी दिली. त्यानंतर रुग्णाच्या नातेवाइकांनी रुग्णालयाच्या काउंटरवर जाऊन ४०० रुपये भरले, त्यानंतर ते सीटी स्कॅन करण्यासाठी संबंधित कक्षात गेले असता सीटी स्कॅन मशीन बंद आहे, असे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर डॉ. इंदूरकर यांनी ४०० रुपये परत करण्याबाबत लिहून दिले; परंतु अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक वानखेडे यांनी आपली रक्कम शासनजपा झाली आहे. ती परत करता येणार नाही, असे नातेवाइकांना सांगितले.

सीटी स्कॅन न करताच ४०० रुपये रुग्णालयाने हडपले, असा आरोप वानखडे यांच्या नातलगांनी केला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही सपना वानखेडी यांच्या नातलगांनी केली आहे. या संदर्भात रुग्णालय प्रशासनाची बाजू जाणून घेण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक सचिन तडस यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here