शिवसेनेच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने! जिल्हाधिकारी यांच्या मार्फत प्रधानमंत्र्यांना पाठविले निवेदन

वर्धा : मागील एक वर्षांपासून सततची पेट्रोलियम वस्तूच्या किंमतीत होत असलेली लक्षणीय वाढ आत्ता सर्वसामान्य नागरिकांना त्रासदायक ठरली असून केंद्र सरकारचा निषेध शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल देवतारे, प्रशांत शहागडकर यांच्या नेतृत्वात करण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून केंद्र सरकार विरोधात नारेबाजी करण्यात आली. केंद्रातील मोदी सरकारने स्वयंपाक गॅस, पेट्रोल, डिझेल च्या किंमतीत लक्षणीय वाढ केली आहे. याचा निषेध शिवसेनेच्या वतीने करण्यात आला. नुकतेच केंद्र सरकारने घरगुती स्वयंपाक गॅस सिलेंडर चा दर रु ७७१, पेट्रोल प्रति लिटर, रु ९३, डिझेल प्रति लिटर, रु ८३ प्रति लिटर असा प्रकारे अचानक वाढ करण्यात आली. मागील एक वर्षात वारंवार होणारी गॅस, पेट्रोल, डिझेल ची दरवाढ हे देशातील नागरिकांना न परवडणारी असल्याने ती कमी करण्यात यावी याकरिता जिल्हाधिकारी यांचे मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन पाठवण्यात आले.

यावेळी उपजिल्हाप्रमुख तुषार देवढे, निवासी उपजिल्हाप्रमुख गणेश इखार, विधी व कायदे विषयक सल्लागार अँड. उज्ज्वल काशीकर, तालुका प्रमुख सुनिल पारिसे, श्रीकांत मिरापूरकर, भालचंद्र साटोने,शहर संघटक बालू वसू, गणेश पांडे, पुलगाव शहर प्रमुख नाना माहुरे, मिलिंद शहागडकर, अमित बाचले, महेश शास्त्री, मोहन निंबाळकर, मिथून उईके, अमर दांडदे, नेहारे, प्रियांशु रघुवंशी, अर्पित ठाकरे इर्शाद पठाण, मयूर शर्मा, पवन चावरे, बिट्टू शेंडे सहित शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here